"संजय घोडावत विद्यापीठामध्ये अल्युमनी मीट २०२५ उत्साहात संपन्न”

कोल्हापूर - संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीतर्फे आयोजित केलेल्या "संगम : ज्ञान, अनुभव आणि यशाचा संगम" या अल्युमनी मीट २०२५ कार्यक्रमाचे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण करणे व सध्याच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे व्यासपीठ उभे करणे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता प्रा. डॉ. गिरी योगेश्वरी एल. यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
कुलगुरू प्रो. डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी २० हून अधिक यशस्वी उद्योजक व व्यावसायिक माजी विद्यार्थ्यांना "डिस्टिंग्विश्ड अल्युमनी ऑफ फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट" या सन्मानाने गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अर्जुन पाटील, सलोनी कुर्ने, दीक्षा शर्मा, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. एल. देशपांडे, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम केवळ आठवणींचा मिलाफ नव्हता, तर तो ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेचा संगम ठरला, जो भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग दाखवणारा ठरेल.