HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Jalgaon Accident : दोन मैत्रिणी क्लासला सोबत निघाल्या, आदितीवर काळाने घाला घातला

Jalgaon Accident : दोन मैत्रिणी क्लासला सोबत निघाल्या, आदितीवर काळाने घाला घातला

जळगाव: सावदा येथून भुसावळकडे क्लासला निघालेल्या दोन डॉक्टरांच्या मुलींना अपघाताची भीषण झळ बसली. १३ वर्षांची आदिती सोपान खडसे या विद्यार्थिनीचा रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण व अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.

रविवारी दुपारी एक वाजता, सावदा येथून भुसावळकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षाला (MH 19 CW 3590) आमोदा गावाजवळ समोरून येणाऱ्या लाल रंगाच्या मालवाहू ट्रकने (MH 19 S 7064) जोरदार धडक दिली. अपघातात आदितीचा जागीच मृत्यू झाला, तर ओजल संदीप पाटील, सार्थ शंतनु सरोदे, चालक प्रभाकर ओतारी व इतर दोन जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदितीवर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे सावदा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.