'तो' 8 वर्षे करत होता भाडेकरू महिलेवर अत्याचार

'तो' 8 वर्षे करत होता भाडेकरू महिलेवर अत्याचार

मुंबई : घनसोली येथील नवघर आळीत भाड्याने राहणाऱ्या एका महिलेवर, रूम मालक प्रदीप रामकृष्ण पाटील यांनी सन 2016 ते 2024 पर्यंत म्हणजे तब्बल 8 वर्ष शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेचा पती बाहेर देशात कामाला असल्याचा फायदा घेत शारीरिक अत्याचार केल, व पीडित महिलेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.

या  घटनेतील पीडित महिला सन  2016 पासून ते 2024 पर्यंत नवघर आळी, घणसोलीतील प्रदीप रामकृष्ण पाटील यांच्या घरी भाड्याने रहायला होती. पीडीतेचे पती हे परदेशात नोकरीसाठी असल्याने पीडीत महिला या रूम बाबत काही अडचण असल्यास प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क करत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये संभाषण हळूहळू वाढत गेले. दरम्यान पीडित महिलेचा पती परदेशात कामाला असल्याची माहिती प्रदीप पाटील याला मिळताच, प्रदीप यांनी महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करू लागला.

मात्र या गोष्टीला पिडीतेने नकार देताच प्रदीप याने महिलेसोबत जबरदस्ती शारीरिक अत्याचार केला. व त्याचे मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ठेवले. व या घटनेबाबत कुठे वाच्यता करशील तर हे फोटो व व्हिडिओ नवऱ्याला पाठवण्याची व सोशल मीडिया व्हायरल  करण्याची धमकी दिली.

'यानंतर' महिलेने केले धाडस 

या धमकीला घाबरून पिढीतेने नराधम रूम मालक प्रदीप पाटील याचा जबरदस्तीचा शारीरिक अत्याचार तब्बल 8 वर्षे सहन करत होती. मात्र नराधम प्रदीप यांनी पीडितेच्या मुलीवर नजर टाकल्यावर महिलेने धीटपणा दाखवून, घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला पती परदेशातून भारतात परत आल्यावर रूम मालक प्रदीप रामकृष्ण पाटील यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.