HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Kolhapur News : पाकिस्तानला 'खून का जवाब खून से 'असंच प्रत्युत्तर मिळणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kolhapur News : पाकिस्तानला 'खून का जवाब खून से 'असंच प्रत्युत्तर मिळणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पाकिस्तानला  दहशतवाद्यांच्या आडून करत असलेल्या कारवाईबाबत जशास तसं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला इट का जवाब पत्थर से आणि खून का जवाब खून से असंच प्रत्युत्तर मिळणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. कोल्हापुरातील जयसिंगपुरात शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, पहेलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनात पाकिस्तानाबद्दल प्रचंड द्वेष आहे. पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणार आहे. ज्या दिवशी पहलगाम इथं निरपराध पर्यटकांना गोळ्या घालण्याचं पाप केलं, तेव्हापासून या देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहे. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घर मे घूस के मारेंनेवाला भारत आहे आणि याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या भावना कळतात. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांच्या आडून करत असलेल्या कारवाईबाबत त्याला जशास तसं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले , जयसिंगपूर शहरात उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्या सोबतच या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून भविष्यात आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडतील. त्यामुळे शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था आपण निर्माण करत आहोत.  

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 

भारत-पाकिस्तान सीमेवर काश्मीरमध्ये कुपवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जवानांनी उभा केला. या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला बोलावलं होतं. तो पुतळा पाहिला, महाराजांच्या हातातील तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने हिंदुस्तानच्या भूमीकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये, अशी संकल्पना जवानांनी अश्वारूढ पुतळाच्या माध्यमातून केली असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.