Nashik News : नायलॉन मांजाचा कहर कायम ; तरुणाच्या चेहऱ्याला 50 टाके

सिन्नर : नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर परिसरातील गुरेवाडी शिवारात दुचाकीवरून नांदूर शिंगोटे येथे जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना नायलॉन मांजाने गंभीर इजा झाल्याची घटना घडली.
विनोद शिवाजी आढाव वय 23, रत्ना शिवाजी आढाव वय 19, तसेच पौर्णिमा आढाव वय 19 (सर्व रा. वडगाव सिन्नर, ता. सिन्नर) अशी तिघा जखमींची नावे आहेत.
मांजाने इजा होण्याच्या घटना वारंवार तरीही..
नायलॉन मांजाने इजा होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही नायलॉन मांजाचा वापर मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. हे तिघे दुचाकीने वडगाव येथून नांदुर-शिंगोटेकडे जात असताना ही घटना घडली. विनोद याच्या हनुवटीला गंभीर इजा झाली असून 50 टाके पडले आहेत तर रत्ना व पौर्णिमा यांच्या हाताची बोटे कापली आहेत.