माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज पहाटे हैद्राबाद येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५९ वर्षे होते. प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.
प्रदीप नाईक हे सलग तीन टर्म आमदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप नाईक प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पक्ष फुटीनंतरही माजी आमदार प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. ते बंजारा समाजाचे नेते होते.