कर्नाटकात सरकारी कर्मचारी एकतेचा विजय,म्हणजेच जुनी पेन्शनचा विजय होय.*
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
आता तरी,महाराष्ट्र सरकारने जागे होऊन सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, अन्यथा २०२४ ला याचे परिणाम भोघावे लागणार,व कर्नाटक सारखे परिवर्तन होणार, हे शंभर टक्के सत्य होय.
जुनी पेन्शन नसल्यामुळे कर्मचारी निवृत्तीनंतर कसे जगावे, हा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यासमोर निर्माण झालेला आहे.
म्हणून जुनी पेन्शन हा विषय कर्मचाऱ्यांचा जगण्याचा व जीवन - मरणाचा विषय बनलेला आहे.
त्याच प्रमाणे संपूर्ण भारतातील कर्मचारी सुद्धा जुनी पेन्शन साठी एक वटलेले आहेत,व जुनी पेन्शनची मागणी करत आहेत.
तसेच जिथे जिथे विधानसभा निवडणुका होत आहेत, तिथे जुनी पेन्शनचा मुद्दा म्हणजेच गेम चेंजर ठरत आहे. आणि काँग्रेस जिथे जिथे जुने पेन्शनचे आश्वासन देऊन ते पूर्ण करत आहे.
म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा काँग्रेसवर विश्वास बसला आहे, आणि काँग्रेस जिथे आश्वासन देत आहे, तिथे काँग्रेस सत्ता प्राप्त करत आहे.
तसेच सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी शपथ सुद्धा घेतलेले आहे की, जो पेन्शन की बात करेगा वही २०२४ को,देश पे राज करेगा.