HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सुसंस्कार हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा

सुसंस्कार हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा

सुसंस्कार हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा

मुबारक अत्तार:-

 कदमवाडी (भोसलेवाडी) येथील सुसंस्कार हायस्कूलमध्ये पोस्टर प्रदर्शन, विज्ञान रांगोळी, प्रयोगाचे सादरीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयांवर व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मराठी दिन एकत्रित साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या सचिव सौ.रुबिना अन्सारी होत्या. प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अनिल चव्हाण होते. तर प्रमुख उपस्थित संचालक सौ.शबाना खान, मुख्याध्यापक विजय भोगम यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. महान शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गौरी बाऊदणे, प्रतिक्षा गावडे, संगीता साह, सुजल पाटील, गायत्री तुपूरवाडकर, अनुष्का वायंगणकर, वैष्णवी गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. या उपक्रमासाठी सौ.जकिया मगदूम, गजानन गुरव, सौ.शोभा कांबळे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक विजय भोगम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन सुजल पाटील, समृध्दी घडशी यांनी केले तर संजय कळके यांनी आभार मानले.

       उपकरण स्पर्धेतील विजेते विदयार्थी पुढील प्रमाणे: समृध्दी घडशी (न्यूटन्स क्रॅडल), सुजल पाटील (हायड्रॉलिक क्रेन), देवेन पवार (स्मोकर उपकरण), राजनंदिनी कुलदिप (किडनी मॉडेल), मयुरी पाटील (सॅटेलाईट ट्रान्समिशन). विज्ञान रांगोळी स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांक पुढील प्रमाणे योगिता फाळके, रसिका शेळके, गायत्री तुपुरवाडकर. विजेत्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.