Solapur Crime : दारूच्या नशेत पत्नीचा केला खून अन् दुसऱ्या दिवशी स्वतः.... सोलापुरातील खळबळजनक घटना

सोलापूर : व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी आणि वडिलांना मारहाण केली. वडिलांचा हात फ्रँकचर केला आणि पत्नीला ठार केलं. दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर पश्चाताप झाला आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) या ठिकाणी घडली आहे. वैराग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वसंत अंबादास पवार आणि आयनाबाई ऊर्फ सोनाबाई वसंत पवार अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत.
वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे वसंत पवार (वय ५५) हे खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात. वसंत यांना दारूचं व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी आयनाबाई ऊर्फ सोनाबाई हिच्याशी किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते. मंगळवारी रात्री असेच दारू पिऊन आल्यानंतर वसंत यांनी पत्नी आयनाबाई आणि वडील अंबादास या दोघांनाही किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
वसंत याने केलेल्या मारहाणीत आयनाबाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागला होता. आयनाबाई या हल्ल्यात जागीच गतप्राण झाल्या. वसंत पवार याने वडील अंबादास लक्ष्मण पवार यांनाही त्याच रात्री लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. अंबादास यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. मंगळवारी रात्री पियालेल्या दारूची नशा बुधवारी सकाळी उतरल्यानंतर रात्रीच्या मारहाणीत वडिलांचा हात फॅक्चर झाला आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे, हे वसंतला कळालं.
वसंत पवार याने दारूच्या नशेत वडील आणि पत्नीला जबर मारहाण केली होती. पत्नी तर जागीच ठार झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर वसंत पवार याला घोर पाश्चाताप झाला. आपण केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. वसंत याने बुधवारी सकाळी बदामाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.