HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

धंगेकर शिंदे शिवसेनेच्या गळाला? शुक्रवारी काँग्रेस बळकटीचा नारा अन् सोमवारी टाटा-बाय बाय

धंगेकर शिंदे शिवसेनेच्या गळाला? शुक्रवारी काँग्रेस बळकटीचा नारा अन् सोमवारी टाटा-बाय बाय

पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून रवींद्र धंगेकर कॉँग्रेसला रामराम करणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर आज माजी आमदार आणि नेते रवींद्र धंगेकर यांनी शिक्कामोर्तब केलंच. ना ना म्हणता-म्हणता रवींद्र धंगेकरांचं सूत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर अखेर जुळलंच. रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं घोषित केलं, तर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून अपेक्षित निर्णय घेऊ, असं जाहीर केलं. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे आता शिंदे सेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे.

ही घोषणा करण्याच्या दोनच दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं होतं. माझं काँग्रेसमध्ये काही बिनसलं नाही, मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमधील बैठकीला मला आमंत्रण असतं, काही बैठकांना कामानिमित्त जाता येत नाही, पण बहुतांश बैठकांना मी हजर असतो. काँग्रेस कशी बळकट होईल यासाठी काम करत आहे, अस एका माध्यमाशी बोलताना धंगेकर यांनी सांगितलं होतं. 

 शुक्रवारपर्यंत आपण काँग्रेस वाढीसाठी काम करणार असं ठामपणे सांगणाऱ्या धंगेकरांचं दोन दिवसात असं काय बिनसलं, की त्यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला यावरून आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि काँग्रेस बळकटीसाठी यापुढे काम करणार, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर पूर्णविराम लावला होता. आज अखेर लोकांची कामं करण्यासाठी सत्तेची गरज असल्याचा साक्षात्कार रवींद्र धंगेकर यांना झाला आणि त्यांनी शुक्रवारी जो पक्ष आपण बळकट करणार असं ठासून सांगितलं होतं, त्यालाच दोन दिवसात रामराम ठोकला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष बदलण्याच्या पॅटर्नमध्ये आणखी एका पक्षाची वाढ झाली आहे.

धंगेकर यांच्या मागण्या काय ? 

वास्तविक पाहता रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उदय सामंत यांच्यामार्फत चर्चा सुरू होत्या. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना पक्षाकडून काय दिले जाणार याच्या वाटाघाटीच्या काही बैठका देखील झाल्याची माहिती आहे. रवींद्र धंगेकर यांनी आज या संदर्भात बोलताना या चर्चा फेटाळल्या असल्या तरी शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर यांनी म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद द्यावी अशी मागणी केली होती. त्यासोबतच महापालिका निवडणुकीमध्ये 15 ते 20 जागा आपल्याला मिळाव्यात. अशी देखील मागणी केली होती.

आता रवींद्र धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी काय कमिटमेंट दिली, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तूर्तास रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष बदलाचं शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता शिंदे सेना असं वर्तुळ पूर्ण झालं  आहे.  

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.