क्रीडा संकुलात कंत्राटी ऑपरेटरने केला २१.५९ कोटींचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगर : येथील विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाखांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे येथे काम करत असलेल्या संशयितास 13 हजार रुपये पगार आहे. त्याने नुकतीच स्वतःसाठी एक बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. तर त्याने गर्लफ्रेंडला आलिशान एरियात २ बीएचके लक्झरी फ्लॅट गिफ्ट दिला. हर्षलकुमार अनिल शिरसागर (वय २३) राहणार बीड बायपास असे संशयिताचे नाव असून तो फरार आहे. तर यशोदा जयराम शेट्टी (वय 38) तिचा पती जीवन कार्यप्पा विजेंडा (वय ४७) गादीया विहार अशी संशयीतांची नवे आहेत.
याप्रकरणी क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी यांनी पोलिसात फिर्याद दिली. हर्षल याला कंत्राटी ऑपरेटर म्हणून फेब्रुवारी 2022 पासून दिशा फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नियुक्त केले. तर यशोदा शेट्टी हिलानी यांची वेब मल्टी सर्विसेस कंपनीने लिपिक म्हणून २०२३ साली निवड केली. हर्षलकुमारने क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करून बँकेची व्यवहार केले. यासाठी स्वतःचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर चा वापर करून सहा महिन्यात त्तब्बाल 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यशोदा आणि तिच्या पतीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी हर्षल कुमार हा आलिशान गाडी घेऊन फरार आहे.
हर्षल कुमारने घोटाळ्यातील पैशातून मैत्रिणीला खुश ठेवण्यासाठी वाट्टेल तसे पैसे उधळले. शहरातील हाय प्रोफाईल एरिया म्हणून ओळख असलेल्या विमानतळासमोरील सोसायटीत नुकताच चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरी फ्लॅट घेतला. तर दुसरा दोन बेडरूमचा आलिशान फ्लॅट मैत्रिणीसाठी दिला. घोटाळा केल्यानंतर चार महिन्यात हर्षल ने 1.30 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार तर 32 लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी घेतली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून आणखी काही संपत्ती खरेदी केले आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.