HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पृथ्वीतलावर

Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पृथ्वीतलावर

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय वंशाची आणि नासामधील वरिष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पृथ्वीतलावर उतरली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले. फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले. जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या. आठ दिवसांची मोहिम तब्बल 9 महिने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून होतं. अखेर त्या परतल्या असून जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत, क्रू-9 चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत. 

सुनीता विलियम्स यांचा 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक

नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी, 'अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला' म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे.

5 जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.