राजमाता जिजाबाई फाउंडेशनचा 'युवा प्रेरणा पुरस्कार' मुकुंद पाटील यांना प्रदान

राजमाता जिजाबाई फाउंडेशनचा 'युवा प्रेरणा पुरस्कार' मुकुंद पाटील यांना प्रदान

कोल्हापूर : राजमाता जिजाबाई फाउंडेशन आमशीच्या वतीने देण्यात येणारा 'युवा प्रेरणा पुरस्कार' शेतकरी आंदोलक आझाद हिंद क्रांती संघटना प्रमुख मुकुंद पाटील यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राजमाता जिजाऊ फाउंडेशन आमशी यांच्या वतीने कृषी ,सामाजिक शैक्षणिक  व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना  मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या फौडेशनच्या वतीने  वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत .यावेळी शिवजयंती 2025 निमित्त निंबंध स्पर्धा , रांगोळी ,चित्रकला स्पर्धा  व्याख्याने असे उपक्रम राबविण्यात आले होते. त्यातील स्पर्धकांना विविध बक्षिसे देण्यात आले.  

मुकुंद पाटील यांच्याविषयी : 

मुकुंद पाटील यांनी  आजवर आंदोलने , ठिय्या आंदोलन , उपोषणे , पायी दिंडी , आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन यातून शासनाला  निवेदने देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आंदोलन , बालिंगा- धामोड- राधानगरी राज्यमार्ग व्हावा ,कसबा बीडमध्ये भोगावती नदीवर बास्केट ब्रिज व्हावे अशा अनेक मागण्या गेली अनेक वर्ष आंदोलनातून  केल्या. यातील प्रमुख मागण्या शासनाने मंजूर केल्या असून  अपूर्ण मागण्यांचे पाठपुरावे आजही सुरू आहेत. 

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजमाता फाउंडेशनचे संदीप पाटील , धनाजी पाटील  व इतर सदस्य आज पर्यंत विविध सामाजिक कामे करत आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना आधार व सेवा मिळत आहे.

यावेळी या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह धनश्री प्रकाश पाटील (कुंभी संचालक )संदीप पाटील , धनाजी पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी लोंढे ,दीपक कुंभार , रणधीर पाटील, बाळासाहेब खांडेकर व विविध मान्यवर उपस्थित होते .