HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा 57,400 मिळकतधारकांनी घेतला लाभ

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचा 57,400 मिळकतधारकांनी घेतला लाभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2025 - 26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली होती. या योजनेचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले असून अद्यापही ज्या मिळकतधारकांनी आपला घरफाळा भरणा केलेला नाही. त्यांनी 30 जून अखेर घरफाळा बिल भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 27 जून अखेर 57,400 इतक्या मिळकतधारकांनी 27 कोटी 18 लाख इतकी रक्कम भरणा करुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे. 

तसेच ज्या मिळकधारकांना अद्यापही पोस्टामार्फत बिल मिळाले नसलेस त्यांनी जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन दुबार बिलाची प्रत प्राप्त करुन घेऊ शकतात. 28 व 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीचे असली तरी नागरीकांच्या सोयीसाठी शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आलेली आहेत.

महानगरपालिकेमार्फत पाठविणेत आलेल्या बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा गुगल पे, फोन पे, पेटीएम व महापालिकेच्या वेबसाईटवरील ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करता येईल. तरी नागरीकांना कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जावून आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.