HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अलमट्टी उंची बाबत लवकरच सर्व पक्षीयांची बैठक : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अलमट्टी उंची बाबत लवकरच सर्व पक्षीयांची बैठक : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापूर - कोल्हापूर, सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी जबाबदारी नाही ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह अलमट्टी कशी जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मुद्यावर पूर्ण अभ्यास करून 15 दिवसांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन बैठक घेऊ असे सांगितले. 

तत्पूर्वी आंदोलकांनी निवेदन देऊन उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूर मध्ये बैठक करावी अशा सूचना कोल्हापूर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना आदेश केले.

या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री आमदार सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत पण त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करून  सरकारची भूमिका चुकीची असून या महापुरास अलमट्टी जबाबदार असून या धरणाची उंची वाढवून दिली जाणार नाही. सरकारने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा दिला.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार  इद्रिस नायकवडी, आ. डॉ. विनय कोरे,आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, आ. राजेंद्र पाटील - यड्रावकर, आ. अमल महाडिक, आ. सत्यजित देशमुख, आ. सुहास बाबर,आ. अशोकराव माने, माजी आ. प्रकाशअण्णा आवाडे व जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आंदोलकांच्या वतीने आ. अरुण लाड,माजी आ. उल्हास पाटील इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, माजी सभापती बाजार समिती कोल्हापूर भारत पाटील, माजी सभापती करवीर राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील, दिपक पाटील, नागेश काळे, डॉ. अभिषेक दिवाण, दिनकर पवार आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.