कार्यकर्त्यांना राजकीय संधी देऊन जीवनात उभं करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं - ना. हसन मुश्रीफ

लिंगनूर - गेल्या ३०- ३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये कार्यकर्त्यांनी आणि मीही जीवाला जीव दिला. त्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी देऊन त्यांना जीवनात उभं केल. त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. हेच माझ्या यशाचे खरे रहस्य आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. या कार्यकर्त्यांनी माझ्या प्रत्येक निवडणुकीत जीवाचं रान हाडाची काळ आणि रक्ताचे पाणी केलं. त्यामुळेच हा हसन मुश्रीफ इथपर्यंत पोहोचू शकला. कार्यकर्त्यांबद्दलची कृतज्ञतेची ही भावना सदैव माझ्या अंतकरणात राहिली आहे. काही- काही वेळा इच्छा असूनही आम्ही त्यांना संधी देऊ शकत नाही त्यामुळे माझं मन विषन्न होतं, असेही ते म्हणाले.
लिंगनूर - कापशी ता. कागल येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवालयाचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून "ब वर्ग" यात्रा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्या अंतर्गत पाच कोटी रुपये निधीतून मंदिर आणि परिसरासह विकासकामे झाली आहेत तसेच; पर्यटन स्थळ योजनेतून अडीच कोटी निधी मिळाला आहे अशा एकूण आठ कोटी निधीच्या विकासकामांचा लोकार्पण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, बिद्री साखर कारखान्यामध्ये स्वीकृत संचालक म्हणून भाजपच्यावतीने भूषण पाटील यांना संधी मिळणार आहे. बेलवळे बुद्रुक येथील सरपंच नारायण पाटील यांच्या नावाची मंजुरी तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकलेली आहे. ही मंजुरीही लवकरच मिळेल. बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक जगदीश पाटील हे मला माझ्या मुलाप्रमाणे आहेत. मी त्यांच्यावर पुत्रवत जीवापाड प्रेम केलं आहे. त्यांना मी कधीही अंतर देणार नाही. त्यांना योग्य न्याय देऊ. निढोरीच्या देवानंद पाटील, नानीबाई चिखलीचे सदाशिव तुकान यांनाही योग्य न्याय देऊ. तसेच; यापूर्वी संचालक झालेल्यांमध्ये बिद्रीचे पांडूतात्या पाटील, सोनाळीचे डी. एम. चौगुले, बेलवळे खुर्दचे दिनकरराव कोतेकर, नानीबाई चिखलीचे प्रवीणसिंह भोसले, कुरुकलीचे विकास पाटील या प्रमुखांचा समावेश आहे. या सर्वांना न्याय आणि योग्य अशी संधी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
यावेळी सरपंच स्वप्निल कांबळे, उपसरपंच सुनीता चेचर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, डी. पी. पाटील, बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील - कुरुकलीकर, बिद्रीचे संचालक आर. व्ही. पाटील, संभाजीराव यादव, दत्ता पाटील, यशवंत गुरव, भाऊसाहेब पाटील, युवराज जाधव, तुकाराम देसाई, विजय हुल्ले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.