गृहमंत्रीपदाचा वाद? फडणवीसांचा खुलासा!

गृहमंत्रीपदाचा वाद? फडणवीसांचा खुलासा!

मुंबई वृत्तसंस्था  : महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवंय का, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सुस्पष्ट उत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची मागणी कधीच केली नाही. त्यांनी फक्त तीन-चार खात्यांवर चर्चा होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल."

गेल्या ७.५ वर्षांत गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच राहिलं असून, ते हे पद सोडण्याची शक्यता कमीच आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या विधानाने गृहमंत्रीपदाबाबतचा संभ्रम काहीसा दूर झाल्याचं दिसतं.

दरम्यान, शिंदे गटाकडून अजूनही या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. गृहमंत्रीपदाचा तिढा सुटण्यासाठी आगामी चर्चांना महत्त्वाचं मानलं जात आहे.