अवैध गौण खनिज वाहतूक न रोखल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करणार

अवैध गौण खनिज वाहतूक न रोखल्यास मनसे  स्टाईलने तीव्र आंदोलन करणार

कोल्हापूर ते गगनबावडा या महामार्गाची सध्या निर्मिती सुरू असून रस्त्याला लागणारा गौण खनिज याची चौकशी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत केली असता त्यांचा निदर्शनास आले की,शासनाने बंधनकारक करून सुद्धा विना जी.पी. एस सिस्टम वाहतूक,कोणताही शासकीय कर न भरता वाहतूक,कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसलेली वाहन आढळून आले. संबंधित व्ही.पी शेट्टी कंपनीने कोट्यावधी रुपयाचा शासनाचा कर बुडवून आपली तिजोरी भरलेले आहे.संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून जास्ती

त जास्त दंड वसूल आकारून यांचा परवाना रद्द करण्यात यावा आणि संबंधित कंपनीवर कारवाई न झाल्यास तसेच शासनाकडून दिरंगाई होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झल्यास व्ही.पी. शेट्टी कंपनी व संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी उपजिल्हाधिकरी महसूल मा.डॉ.संपत खिल्लारी यांच्याकडे करण्यात आली.यावेळी शरद जाधव,विक्रम नरके,अरविंद कांबळे,अमित बंगे,अमर कंदले उपस्थित होते.