सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल -पद्मश्री डॉ. बावस्कर

सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल -पद्मश्री डॉ. बावस्कर
कोल्हापूर प्रतिनिधी: सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पहिल्या दिवशीच्या आरोग्य विषयक सत्रात पहिले पुष्प गुंफताना जागतिक किर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर म्हणाले, “ आज अन्न,वस्त्र, निवारा ,शैक्षणिक गरजा हि पूर्ण करण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत.मात्र आरोग्य विषयक संपन्नता हि बाजारात कुठे हि विकत मिळत नसुन ती कमवावी लागते.
आरोग्य हा विषय अत्यंत महत्वपूर्ण असुन मठावर होणारा पर्यावरण व आरोग्याचा जागर हा जगाला परिपूर्ण आरोग्याची दिशा देणारा ठरणार असल्याचं प्रतिपादन पद्मश्री डॉ. बावस्कर यांनी केलं.
आपल्या आचरणात जर नैसर्गिक सोई सुविधा,आहार विहार, विचार ,आचरणात आणल्यास चांगल्या जगण्यासाठी सुखद मृत्यू देवू शकतो. आपलं आरोग्य हे बाजारात कधीच विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते .
वेळीच पर्यावरण व आरोग्याकडे लक्ष द्या अन्यथा विनाश व्हायला खूप वेळ लागणार नाही असा इशारा यांनी यावेळी दिला.
अतिरिक्त विचाराना विराम देवून अध्यात्म ज्ञान याचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास मदत होईल.” असे मार्गदर्शन कार्यक्रमात यांनी केलं.व्यासपीठावर सुरेंद्र जैन, हरीश बोटले , विनय हसबनीस, प्रकाश पाटील , डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.