HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार ना. चंद्रकांत दादा पाटील

आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार ना. चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी करत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले .

        कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्याच्या विभागीय बैठकीमध्ये ते बोलत होते कोल्हापूर येथील अयोध्या हॉटेल या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली .

        यावेळी बोलताना नामदार पाटील पुढे म्हणाले झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश जरी कमी मिळाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास ती महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा दोन लाख मतांनी पुढे जाते असे असले तरी पश्चिम महाराष्ट्र मधील दहा जागांपैकी चार जागा या महायुतीने जिंकलेला असून ही महायुतीचे यश दुर्लक्षित करून चालणार नाही .

          आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पूर्ण तयारीनिशी उतरणार असून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्ते हे ताकतीने काम करतील .राज्य अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित भाई शहा व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेले संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरचे अधिवेशने घेण्यात येतील .

       जिल्हा कार्य कारणी बैठक २ , ३ , ४ , ऑगस्ट 2024 व दरम्यान असून मंडल विस्तारीत कार्यकारणी बैठका ९ , १० , ११ ऑगस्ट 2024 दरम्यान संपन्न होणार आहेत .या बैठकींसाठी राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये कोल्हापूर शहर साठी योगेश टिळेकर कोल्हापूर पूर्व हातकणंगले साठी जगदीश मुळीक , कोल्हापूर पश्चिम साठी योगेश टिळेकर ,सांगली शहर साठी संजय बाळा भेगडे , सांगली ग्रामीण साठी धनंजय महाडिक ,सातारा मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती प्रदेशाच्या मार्फत करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा विभागाची संयुक्त बैठक हॉटेल आयोद्या येथे संपन्न झाली पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांच्या मार्फत संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला यामध्ये विधानसभा संयोजक नियुक्ती मंडळ प्रभारी नियुक्ती मंडळ बैठक तारिका निश्चिती यांचा समावेश होता.

दक्षिण विभाग प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे अनेक दाखले देत आगामी कार्यक्रमांची रूपरेषा उपस्थित त्यांना सांगितली.

याप्रसंगी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.