'आज फिर तुमपे प्यार आया है’ मागील सत्य: माधुरीने किसिंग सीन हटवण्याची केली होती मागणी

मुंबई : 1988 मध्ये प्रदर्शित झालेला दयावान हा चित्रपट आजही त्यातील बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत असतो. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या मधील 'आज फिर तुमपे प्यार आया है' या गाण्यातील इंटिमेट सीन त्या काळातील सर्वात चर्चित दृश्यांपैकी एक ठरला होता. त्या सीनमुळे माधुरीला मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली होती.
त्या काळात विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास अनेक अभिनेत्री घाबरत असत. चुंबन दृश्यांदरम्यान खन्ना यांचा संयम सुटतो, असे सांगितले जात असे, ज्यामुळे अनेक सहकलाकार दचकून जात असत. माधुरी दीक्षित हिनेही दयावान चित्रपटातील किसिंग सीनबाबत नंतर नाराजी व्यक्त केली होती.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर माधुरीने हे दृश्य हटवण्याची मागणी करत नोटीस पाठवली होती. मात्र, दिग्दर्शक फिरोज खान यांनी ती मागणी साफ नाकारली. उलट, या सीनसाठी त्यांनी माधुरीला एक कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, पैसे दिले असल्याने सीन कायम ठेवणे गरजेचे आहे.
चित्रपटाच्या कथानकात विशेष दम नसल्याने, बोल्ड सीन हेच प्रमोशनचे केंद्र होते. त्यामधून गल्ला मिळवण्यासाठी या दृश्यांचा प्रचंड वापर करण्यात आला. विनोद खन्ना हे माधुरीपेक्षा सुमारे 20 वर्षांनी मोठे होते, तरीही त्यांच्या जोडीला मोठी प्रसिद्धी मिळाली.
माधुरीने नंतर हे सीन "चूक" मानले असले, तरी या चित्रपटानंतर तिच्या करिअरला मोठा टप्पा मिळाला. दयावानने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.