रणवीर अलाहाबादियाला कोर्टाने फटकारले ; अटकेला अंतरिम स्थगिती

रणवीर अलाहाबादियाला कोर्टाने फटकारले ; अटकेला अंतरिम स्थगिती

मुंबई: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ अश्लील वक्तव्य करणाऱ्या यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याला मंगळवारी न्यायालयाने दणका दिला आहे. शो मध्ये केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने त्याला फटकारले आहे. मात्र त्याच्या अटकेला अंतरिम स्थगिती देऊन दिलासा देतानाच, यापुढे या प्रकरणी कोणताही एफआयआर नोंदवू नये, असे आदेश दिले आहेत.

युट्यूबर्सशी घेतली शाळा '

इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात अश्लाघ्य भाषा वापरणारा यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याला मंगळवारी फटकारले. मात्र त्याच्या अटकेला अंतरिम स्थगिती देऊन दिलासा देतानाच, यापुढे या प्रकरणी कोणताही एफआयआर नोंदवू नये, असे आदेश दिले आहेत.‘तुम्ही जे शब्द वापरले, त्यामुळं तुमच्या आई-वडिलांना, बहिणींना व संपूर्ण समाजाला लाज वाटेल. तुमच्या मनातील विकृती त्या कार्यक्रमात उफाळून बाहेर आली,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं युट्यूबर्सशी शाळा घेतली आहे.

अलाहाबादिया याने महाराष्ट्र, आसाम व राजस्थानात दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. सूर्यकांत व न्या. एम कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठानं अलाहाबादिया याच्या वर्तनाबद्दल त्याच्या वकिलांना चांगलंच खडसावलं.

‘यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरील अश्लील मजकुराबद्दल तुम्ही (सरकार) काही करणार आहात का? हे आम्हाला पुढील सुनावणीत जाणून घ्यायचे आहे,’ अशी विचारणा न्या. सूर्यकांत यांनी केंद्र सरकारला केली आहे.

कार्यक्रम करण्यावर मनाई, या अटींवर जामीन

जीवित आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी अलाहाबादिया महाराष्ट्र आणि आसामच्या स्थानिक पोलिसांकडं जाऊ शकतो. त्यानं ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये, अलाहाबादिया आणि त्याचे सहकारी यांनी सध्या इतर कोणताही कार्यक्रम करू नये, अशा अटी न्यायालयाने जामीन देताना घातल्या आहेत.