कोल्हापुरात आराम कॉर्नर येथे एकाचा खून

कोल्हापुरात आराम कॉर्नर येथे एकाचा खून

कोल्हापूर (प्रतिनिधी):  कोल्हापूरातील आराम कॉर्नर येथे हातगाडी लावण्यावरुन झालेल्या मारामारीत एकाचा चाकुने भोकसून खून  करण्यात आला. मयत व्यक्तीचे नाव इम्रान मुजावर असे आहे. या घटने दरम्यान मुजावर यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे सीपीआर आवारात नातेवाईकांनी गर्दी केली होती. संशयित आरोपी युसुफ अलमसजीत (दाजी) याला राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऐन गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना खूनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास राजवाडा पोलीस करीत आहेत.