उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर प्रतिनिधी : रस्ते वाहतूक सुरक्षा व वाहन चालकांविषयी नेहमी जागृत असणारे उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्र, युवा ग्रामीण विकास संस्था, आरोग्य प्रतिबंध विभाग ,गोकुळ शिरगाव, महामार्ग मृत्यूजय दुत , महालक्ष्मी ब्लड बँक, कागल यांच्या वतीने मोफत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास समाजातील सर्वच घटकांतून मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३०१ रक्तदात्यानी रक्तदान केले.
सामाजिक बांधिलकी उपक्रमातून समर्थ मंगल कार्यालय, उजळाईवाडी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी या विषयी प्रबोधन करण्यात आले. शिबिरात वाहन चालक, महामार्ग मृत्यूंजय दुत , ठाणे अंमलदार,ट्रॅफिक पोलिस, तरुण मंडळ कार्यकर्ते, यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रसाद बिंदगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्याना हेल्मेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या शिबिरासाठी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक सुरेश मेखला, पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस उपअधीक्षक गजाजन टोणपे, सपोनि सत्यराज घुले, पोलिस उपनिरिक्षक प्रदीप जाधव, सुनील माळगे, रवींद्र गायकवाड, दीपक ठोंबरे,व पोलिस अंमलदार,, महामार्ग पोलीस मृत्यूंजय दुत जयकुमार मोरे, विनोद चोपडे, गणेश नागटिळक, बाळासाहेब नलवडे, प्रमोद जगताप, नरेश खांडेकर यांच्यासह पत्रकार मित्र, पोलिस मित्र, वाहतूक मित्र, ट्रान्सस्पोर्ट संघटना, विविध स्तरातील ग्रामस्थ, कामगार उपस्थित होते.
गेले वर्षभर महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा देत, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व रक्त दान शिबिर चे आयोजन मोठ्या प्रमाणात 301 केल्याबद्दल महामार्ग पोलिस चे वरिष्ठ, अधिकारी महामार्ग पोलीस सपोनि सत्यराज घुले साहेब व समस्त महामार्ग पोलीस यांच्या वतीने महामार्ग पोलीस मृत्यूंजय दुत जयकुमार मोरे, यांच्या सत्कार करण्यात आला.