उत्तरप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात;डिब्रुगड एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसच्या अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार ठार तर १४ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.हि संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अपघातामुळे गोरखपूर ते लखनौ डाऊन दिशेच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. सध्या सहा ते सात रेल्वेगाड्या रूळ रिकामा होण्याची वाट पाहत उभ्या आहेत.
घटना झिलाही रेल्वेस्टेशनच्या जवळ घडली आहे. प्रशासनाने तत्काळ बचाव पथकं घटनास्थळी पाठवली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.