कोरे अभियांत्रिकी व वारणा महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर कार्यशाळा संपन्न

कोरे अभियांत्रिकी व वारणा महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर कार्यशाळा संपन्न

वारणानगर (प्रतिनिधी) : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या डायमंड जुबली च्या निमित्ताने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉटनॉमस वारणानगर आणि यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय यांच्यावतीने रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टीचिंग अँड रिसर्च या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी गेट सेट गो वर्ल्ड मुंबई या संस्थेच्या डॉ. दिलीप पाटील व व डॉ. संजय रहाटे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, वारणा महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, पॉलिटेक्निक, फार्मसी डिप्लोमा या महाविद्यालयामधील ६० हून अधिक प्राध्यापकानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या का एक दिवसीय कार्यशाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आधुनिक अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये तसेच संशोधनामध्ये अमुलाग्र बदल करता येतील. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने पुस्तकाचे लिखाण कमीत कमी वेळेत करून ती प्रकाशित कशी करावीत याबाबतची प्रात्यक्षिके या कार्यशाळेमध्ये करून दाखवण्यात आली.

कार्यशाळेसाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम शेख, अभियांत्रिकीचे अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, अभियांत्रिकीचे प्रभारी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, फार्मसी चे प्राचार्य, डॉ. किरण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका माधुरी खुजट यांनी केले.

डॉ. राजकुमार पांडव, डॉ रंगराव कावणे प्रा. गणेश कांबळे आणि प्रा. प्रितेश लोले, सिस्टम अँड नेटवर्क, विभागप्रमुख,. एन. बी. जाधव यांनी काय कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.