HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना करवीर मधील शिवसैनिक जागा दाखवतील- संजय पवार

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना करवीर मधील शिवसैनिक जागा दाखवतील- संजय पवार

प्रयाग चिखली (प्रतिनिधी) :    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री च्या आशीर्वादाने आणि करवीर मधील निष्ठावंत शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले म्हणून चंद्रदीप नरके दोन वेळा आमदार झाले होते मात्र त्यांनी ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे .अशा गद्दाराला जागा दाखवण्यासाठी करवीर मधील शिवसैनिक पेटून उठला असून गद्दारी ला पराभुत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी केली .

    प्रयाग चिखली येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात पवार बोलत होते .करवीर मधील शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा निष्ठावंत शिवसैनिक आहे . त्यांनी मातोश्री वरील निष्ठेपोटी च नरकेना आमदार केले मात्र त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे जातीवंत शिवसैनिक या गद्दारीचा बदला घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले .करवीर मध्ये पूर्वी कधीच पैशाचे राजकारण होत नव्हते . आता माणसांचा दर काढून गप्प बसण्यासाठी पैसा पेरला जात आहे . पैशाचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्या साठी नरकेना गावागावात गद्दारीचा जाब विचारा असे पवार यांनी सांगितले .

    यावेळी बोलताना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी नरकेंवर घणाघाती टीका करताना करवीर मधील निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर नरकेना संधी दिली मात्र त्यांनी गद्दारी केली . आजही शिवसैनिक मातोश्रीवर निष्ठा ठेऊन असून करवीर मधून राहुल पाटील यांचा विजय निश्चित आहे . त्यांच्या सत्तर हजारच्या लिडच ओझ नरकेना सोसणार नाही असे सांगितले . सत्तेवर नसताना निधी आणल्या च्या वल्गना नरके करत आहेतत्यांची हिंमत असेल तर वडणगे येथे समोरासमोर येऊन केवळ गावांची नावे सांगावीत असे आव्हान देवणे यांनी दिले .

     यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलेकर यांनी काँग्रेस चे कार्यकर्ते आणि उबाठा शिवसेनेचे शिवसैनिकसच्चे निष्ठावंत असून भावी काळात या सर्वांना एकत्र घेऊनच आपल्याला वाटचाल करायचे आहे .ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी माझ्या प्रचारात आघाडी घेतली असून करवीर चा स्वाभिमानी मतदार भूलथापांना कधीही बळी पडणार नाही असे सांगितले .

     यावेळी बोलताना तानाजी आंग्रे यांनी मातोश्रीचा आदेश पाडून राहुल पाटील यांच्या प्रचारात मी जीवाचे रान करणार आहे .विरोधकआता पै पाहुणे ठेकेदार यांना पाठवून आम्हीच दाखवतील .ही निवडणूक आम्ही आता हातात घेतलेले आहे .आपणांसमोर मातोश्री वाचवण्याचे आव्हान उभे ठाकलेले आहे त्यामुळे नरकेना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन केले .

   जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करायला विरोधकांना लाज वाटायला पाहिजे कारण तुम्हाला कमळ व घड्याळ चालत असेलतर आम्हाला हात का चालू नये?असे सांगून नरकेने शिवसैनिकांचा घात केला आहे त्यांना पराभूत केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही असे सांगितले .

    गोकुळचे संचालक चेतन नरके यांनीहा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा असून रात्रीच्या वेळी चोरून येणाऱ्यांना थारा देऊ नका तसेच मातोश्रीचा शब्द वाया जाऊ नका असे सांगून राहुल पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे सांगितले .

यावेळी शेतकरी सेनेचे रणधीर पाटील अरुण पाटील तानाजी पोवार यांची भाषणे झाली .

    या मेळाव्याला सुरेश पोवार उदय सुतार करवीर प्रमुख दिलीप म्हेतर सतिश पानारी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे बाजार समितीचे माजी अध्यक्ष भारत पाटील भुयेकर तालुका संघटीका सौ शुभांगी पोवार वंदना पाटील सुजाता पाटील भरत आमते शिवाजी कवठेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 हे पार्सल तुमच्या वडिलांनी आणले!

     यावेळी बोलताना विजय देवणे यांनी चंद्रदीप नरके यांच्यावर सडकून टीका केली .व्यासपीठावरील चेतन नरके यांना उद्देशूनहे पार्सल तुमचे वडील अरुण नरके यांनी आमच्याकडे आणले होते .तेव्हा ते शिवसेनेचे चिन्ह नको म्हणत होते .नरकेने शिवसेनेला ठरवून फसवलेले आहे असा टोला आणला. 

पी एन साहेब देव माणूस !

      स्वर्गीय पी एन पाटील यांचा व आमचा संपर्क लोकसभेच्या वेळी आला .ते खरेखुरे व सच्चे निष्ठावंत नेते होते .गोरगरिबाची त्यांची नाळ जुळलेली होती .आमचा व त्यांचा यापूर्वी संपर्क आला नाही हे आमचे दुर्दैव आहे .असे सांगून संजय पवार व विजय देवणे यांनी पी एन साहेब हे खऱ्या अर्थाने देव माणूस होते त्यांच्या मुलाला विजयी करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.