HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ए. आर.-व्ही. आर, मल्टिमीडियामध्ये करिअरची सुवर्णसंधी

ए. आर.-व्ही. आर, मल्टिमीडियामध्ये करिअरची सुवर्णसंधी

कोल्हापूर प्रतिनिधी) : १२ वी. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ऑगमेंटेड रिऍलिटी (ए.आर)-वर्च्युअल रिऍलिटी (व्ही.आर.) आणि मल्टिमीडियामध्ये करिअर करण्याची संधी तळसंदे येथील डी . वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने  उपलब्ध केली आहे.  या नव्या अभ्यासक्रमांची माहिती व या क्षेत्रातील विपुल करिअर संधी याबाबत विद्यापीठातर्फे शनिवार दि.  २२ जून रोजी मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमात व्ही.एफ.एक्स क्षेत्रातील वीस वर्षाहून अधिक अनुभव असलेले तसेच अव्हेंजर, ट्रान्सफॉर्मर, स्टार वॉर, रावण, हाऊस फुल, तारे जमीनपर अशा अनेक चित्रपटामध्ये व्ही. एफ. एक्स. कंपोजिटिंग करणारे  "व्ही.एफ. एक्स, डी. एफ. एक्स", मुंबईचे संस्थापक रणजित गोसावी, ए. आर.- व्ही. आर. आणि गेमिंग क्षेत्रात २५ वर्षाहून अधिक अनुभव असणारे "ट्रायोडोक्सीक डिजिटल स्टुडिओचे" संस्थापक अनुकूल कुकडे आणि ऍनिमेशन व व्ही. एफ. एक्स. क्षेत्रात १५ वर्षाहून अधिक कार्यरत असणारे "रेड कार्पेट ऍडव्हेंट एल. एल. पी."चे संस्थापक साकेत सबनीस हे मार्गदर्शन करतील.

ए. आर. आणि व्ही.आर. ही एक मल्टिमीडियाची इमरसिव्ह टेक्नॉलजी आहे. थ्रीडी ऍनिमेशन,व्ही. एफ. एक्स.,थ्री डी मॉडेलचा वापर  ए. आर. आणि व्ही. आर. टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. आर्किटेक्चर, सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मेडिकल, डिजिटल आर्ट, चित्रपट क्षेत्र, ग्राफिक्स आणि ऍनिमेशन इंडस्ट्री तसेच गेमिंग अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये ए. आर.- व्ही. आर. चा वापर केला जातो. या विद्यार्थी  ग्राफिक्स इंडस्ट्री, व्ही. एफ. एक्स.,ऍनिमेशन इंडस्ट्री, गेमिंग इंडस्ट्री अशा बऱ्याच क्षेत्रात ग्राफिक डिजाईनर, यू. एक्स. डिजाईनर, गेम आर्किटेक्ट , गेम डिजाईनर, ए. आर. डेव्हलपर, व्ही.आर.डेव्हलपर,व्ही. एफ. एक्स. स्पेशालिस्ट या पदांवर काम करु शकतो. एन. व्ही. डी. आय. ए.,मेटा , मायक्रोसॉफ्ट, गुगल, युनिटी, इपिक गेम्स अशा बऱ्याच मोठ्या कंपनीज या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ए. आर. व्ही. आर आणि मल्टिमीडिया हे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. 

डी . वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम सुरु करणारी  पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. या ए. आर.-व्ही. आर, मल्टिमीडिया तंत्रज्ञानाबद्दल परिपूर्ण माहिती या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन आणि कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.