'ही' अभिनेत्री ठरतेय बॉलीवूडची क्वीन ; तीन चित्रपटांनी केली तीन हजार कोटींपेक्षा जास्त कमाई

'ही' अभिनेत्री ठरतेय बॉलीवूडची क्वीन ; तीन चित्रपटांनी  केली तीन हजार कोटींपेक्षा जास्त कमाई

माझा महाराष्ट्र ऑनलाईन :  चित्रपटसृष्टीत अभिनेत्याचे आणि अभिनेत्रीचे यश अपयश हे त्यांच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईवरून ठरवले जाते.  आज जर  बॉलीवूड अभिनेत्रींच्या चित्रपटाच्या कमाईबाबत  आणि यशस्वी चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास एका अभिनेत्रीचे नाव सध्या चर्चेत आहे. पण ही अभिनेत्री प्रत्यक्षात बॉलिवूडची नसून ती दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे ब्लॉकबस्टर क्वीन रश्मिका मंदाना आहे. 

रश्मिका मंदाना ही आता हिंदी चित्रपटांची लकी चार्म बनत आहे. कारण तिच्या सलग तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. या यादीत ऍनिमल हा सिनेमा पहिला येतो. २०२३ सालच्या या अद्भुत अॅक्शन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. हा चित्रपट पहिल्या दिवसापासून शेवटच्या शोपर्यंत खचाखच भरलेला होता. त्यामुळेच हा सिनेमा हिट ठरला होता.

२०२४ मध्ये, रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत आली आणि पुष्पा-२ द्वारे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. हा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा चित्रपट होता आणि हिंदी भाषेत त्याने सर्वाधिक कमाई केली. जर आपण या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोललो तर हा आकडा जवळवळ ८०० कोटी रुपये होता. या चित्रपटाने प्रथम थिएटरमध्ये आणि नंतर ओटीटीवरही लोकांचे मनोरंजन केलं आणि आता ओटीटीद्वारे देखील जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

यानंतर नंबर लागतो ते रश्मिकाचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'छावा' चित्रपटाचा. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि तिने सिद्ध केलं की ती खरोखरच एक लकी चार्म बनली आहे. विकी कौशल अभिनीत या चित्रपटाने आतापर्यंत ११६.५ कोटी रुपये कमावले आहेत. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, रश्मिका, सलमान खानसोबत सिकंदरमध्ये दिसणार आहे.