कळे येथे ब्रह्माकुमारी प्रजापिता यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कळे येथे  ब्रह्माकुमारी प्रजापिता यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पन्हाळा (प्रतिनिधी) : चारित्र्य घडवणे हा शिक्षणाचा मुळ उद्देश असून भौतिक शिक्षणाने भौतिकता प्राप्त होते आणि नैतिक शिक्षणातून चारित्र्य घडते असे मत राजस्थानच्या माउंटआबू येथे प्रजापिता ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी व्यक्त केले. ते कळे येथील महाविद्यालयातील जीवनात नैतिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावर बोलत होते.

पन्हाळा तालुक्यातील कळे येतील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने विठ्ठलराव पाटील महाविद्यालयामध्ये जीवनात नैतिक शिक्षणाचे महत्त्व काय असते या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी माउंटआबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी नैतिक शिक्षण माणसाला माणूस बनवते व संपूर्ण जगात धन सुख आणि समृद्धीचा पाया चांगल्या चरित्र्यावरच उभा करता येतो.  तसेच विद्यार्थ्यांनी मूल्यमापन,आचरण, अनुकरण, लेखन, व्यवहारीकन्या यावर विशेष भर द्यावा लागेल. तसेच परीक्षेदरम्यान सकारात्मक विचार ठेवणे गरज आहे.नैतिक शिक्षणाद्वारे आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करू शकता. यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला भोसले व कळे सेंटरच्या प्रमुख गीता बेहणीजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.