HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासकांची मान्यता

काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासकांची मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 33kV(33000volt) मेन विद्युत पुरवठा लाइनमध्ये वेळोवेळी काही तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे या मेन विद्युत पुरवठा लाईनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर बसविण्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या कामासाठी रक्कम 29 लाख इतका खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

काळम्मावाडी थेट पाईप लाइन योजनेच्या मेन विद्युत पुरवठा लाइनमध्ये काही नादुरुस्ती झालेस तातडीने सदर विद्युत लाइन दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका आणि महावितरण यांच्या वेळावेळी बैठका होऊन यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाल्या.  या बैठकांमध्ये राधानगरी EHV Sub-station मधून link लाईन जोडणी करणे व मेन लाइन वर 7 आयसोलेटर स्विच उभारणे बाबत महावितरण मार्फत पर्याय देण्यात आला होता. यामध्ये मेन लाईनवर काही बिघाड झालेस या आयसोलेटरद्वारे तातडीने ती लाईन दुरुस्ती करणे शक्य आहे. त्यामुळे शहर पाणी पुरवठा विभागास महावितरणने रक्कम 29.00 लाखाच्या अंदाजपत्रक सादर केले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच महावितरण मार्फत या योजनेच्या मुख्य लाईनवर लिंक लाईन आणि आयसोलेटर उभारणीचे काम सुरु करण्यात येणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.