भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५१ वी जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने शाहू जन्मस्थळ क.बावडा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार धनजंय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते, उदय शेटके, गायत्री राउत, हेमंत आराध्ये, डॉ. राजवर्धन, माधुरी नकाते, गणेश देसाई, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, विजय अगरवाल, विशाल शिराळकर, अमोल पालोजी, धीरज पाटील, संजय जासूद, अमर साठे, रविकिरण गवळी, धनश्री तोडकर, महेश वासुदेव, रविकिरण गवळी, आशिष ढवळे, युवराज माने, संग्राम जरग, सचिन पोवार, अमित पसारे, सतीश अंबर्डेकर, राजाराम परीट, दीपक काटकर, सुमित पारखे, रोहित पोवार, कोमल देसाई, माधुरी कुलकर्णी, भरत काळे, संग्राम निकम, राजू मोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.