कृषी प्रदर्शनास भेट द्यावी आमदार सतेज पाटील यांच आवाहन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात २५ लाखांची उलाढाल ही झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे यांची याठिकाणी नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. तीन दिवसात ५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे.आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी तांदळाची उच्चांकी विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे. सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "सतेज कृषी प्रदर्शन चार दिवस आयोजन करण्यात आले आहे.२७ डिसेंबर पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुफान, तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर केली होती.
सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील,माजी आमदार ऋतुराज पाटील,माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांची उपस्थिती असणार आहे"
सतेज कृषी प्रदर्शन यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यां सहभागी झाल्या आहेत.त्या कंपन्यांची उत्पादने, अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, विदेशी भाजीपला,फुले,
मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती १२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. शिवाय कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे १३६० किलो वजनाचा युवराज रेडा
याचबरोबर विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई,नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरत आहेत.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण आहेत हे सर्व पाहण्यासाठी तपोवन मैदानावर तुफान गर्दी होत आहे.