HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

केआयटी च्या अध्यक्षपदी साजिद हुदली तर उपाध्यक्षपदी सचिन मेनन यांची निवड

केआयटी च्या अध्यक्षपदी साजिद हुदली तर उपाध्यक्षपदी सचिन मेनन यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय व केआयटी आयएमईआर यांच्या संचालक मंडळाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत २०२४ ते २०२७ या काळासाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून साजिद हुदली, उपाध्यक्ष म्हणून सचिन मेनन तर सचिव म्हणून दीपक चौगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. केआयटी आयएमईआर च्या संचालक विश्वस्त पदी सुनील कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीवेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 

गेल्या ३ वर्षाच्या कॉलेजच्या वाटचालीवर सर्व संचालक मंडळांनी समाधान व्यक्त केले व भविष्यातही अशा प्रकारच्या प्रगतीसाठी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष साजिद हुदली यांनी आगामी काळात केआयटी संशोधनाचे केंद्र बनेल तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवेल याबाबत सर्व संचालक मंडळाला आश्वस्त केले. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जात्मक संशोधन व विकासाचे केआयटी हे केंद्र बनेल. ‘स्टार्टअप्स’ च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आर्थिक मदतीसह तांत्रिक मार्गदर्शन करून तो व्यवसाय प्रत्यक्षात येण्यासाठी संबंधितांना केआयटी मोठे बळ देईल. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष, साजिद हुदली यांनी दिली . 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.