दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; राहुल गांधी काय निर्णय घेणार?

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; राहुल गांधी काय निर्णय घेणार?

दिल्ली (प्रतिनिधी) :इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

                       लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

                      यासंददर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

                       या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधी यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सूचवले असल्याची माहितीही सांगण्यात येत आहे. राहुल गांधी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचच लक्ष आहे.