प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निंबाळकर, व्हॉईस चेअरमनपदी झेंडे

प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निंबाळकर,  व्हॉईस चेअरमनपदी झेंडे
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निंबाळकर,  व्हॉईस चेअरमनपदी झेंडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब निंबाळकर (कागल) यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास झेंडे (पन्हाळा) यांची निवड करण्यात आली. निंबाळकर हे शिक्षक संघ थोरात गटाचे, तर झेंडे हे प्राथमिक शिक्षक समितीचे आहेत. बँकेच्या सभागृहात निवडीसाठी संचालकांची विशेष सभा सहायक निबंधक एस. आर. धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी बाळासाहेब निंबाळकर यांचे नांव अर्जुन पाटील यांनी सुचविले तर त्यास नंदकुमार बाईंगडे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी रामदास झेंडे यांचे नांव शिवाजी रोडे-पाटील यांनी सुचविले तर त्यास गजानन कांबळे यांनी अनुमोदन दिले.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसलेने अध्यासी अधिकारी एस.आर.धायगुडेसो यांनी  बाळासाहेब निंबाळकर यांची अध्यक्ष व रामदास झेंडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेचे जाहीर केले.

सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

सदर सभेस मावळते अध्यक्ष राजेंद्रकुमार पाटील व मावळते उपाध्यक्ष अमर वरुटे तसेच संचालक सर्वश्री सुनिल एडके, अर्जुन पाटील, एस.व्ही. पाटील, शिवाजी रोडे-पाटील, नंदकुमार वाईंगडे, शिवाजी बोलके, बाळकृष्ण हळदकर, बाबुराव परीट, सुरेश कोळी, गौतम वर्धन, गजानन कांबळे,  पद्मजा मेढे, वर्षा केनवडे तसेच सुकाणू समितीचे सर्वश्री जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, बाजीराव पाटील, बाळासाहेब पोवार, प्रकाश खोत, मंगेश धनवडे, संजय कुईकर, तानाजी घरपणकर, डी.जी.पाटील, कृष्णात धनवडे, आनंदराव जाधव, प्रकाश मगदूम, सुकुमार पाटील, रावसाहेब देसाई, जयवंत पाटील, प्रभाकर कमळकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, शाहू आघाडी कागलचे सन्माननीय सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.