HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

केरळ हे 'मिनी पाकिस्तान' ; मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

केरळ हे 'मिनी पाकिस्तान' ; मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

पुणे: मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण (प्रियंका गांधी) तिथे निवडून येतात, असं वक्तव्य राणेंनी केलं आहे. पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय.

पुण्यातील सासवड येथे अफजल खान वधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे? 

‘अफजल खान वधाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला,या गोष्टीला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून येथे उपस्थित राहिलो. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखावतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात, आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत? मग पाकिस्तान मध्ये लावणार का? चार दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाढी कुरवाळावी,’ असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

‘केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहिण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. दहशतवादी लोकांना हाताशी धरुनच हे लोक खासदार झालेले आहेत,’ अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले असुन नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.