केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन:उभाणीसाठी शाहू ग्रुपकडून दहा लाखाची मदत- समरजितसिंह घाटगे

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन:उभाणीसाठी शाहू ग्रुपकडून दहा लाखाची मदत- समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून उभारलेली आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजिराव उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली,बांधलेली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची ऐतिहासिक वास्तू आगीत जळून खाक झाली. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मराठी नाट्यगृहांचा मानबिंदू असणाऱ्या या वास्तूच्या पुन:उभाणीसाठी छत्रपती शाहू ग्रुप मार्फत दहा लाख रुपयांची मदत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज जाहीर केलं.

केशवराव भोसले नाट्यगृह हा कोल्हापूरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. त्यामुळे या नाट्यगृहला लागूनच असलेले शाहू खासबाग मैदान पूर्वीप्रमाणेच दिमाखात उभा राहण्यासाठी छोट्या-मोठ्या संस्था, मंडळे ,सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी आर्थिक मदतीचे हात पुढे करावेत.असे आवाहनही राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे.

समरर्जितसिंह घाटगे म्हणाले,संगीतसूर्य केशवराव भोसले ही ऐतिहासिक वास्तू आगीत जळून खाक झाली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या ऐतिहासिक ठेव्यास लागलेली आग विझवण्यासाठी रात्री तातडीने शाहू साखर कारखान्याचा अग्निशामक दलाची गाडी पाठवण्यात आली होती.या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी शासनाने दहा कोटीची मदत जाहीर केलेली आहे कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या या वास्तूच्या पुन:रउभारणी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.