कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय

मुबारक अत्तार:-

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्या सुधारित विधी सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन पार पडले . सोमवार दि .13/03/2023 ई रोजीपासून मा. श्रीमती के . बी . अग्रवाल , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले . या कार्यालयात उपमुख्य विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून ॲड. पांडुरंग पाटील व ॲड. विश्‍वजीत घोरपडे , सहायक विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून ॲड. सत्यजीत कुंभार, ॲड रेवती देव लापूरकर, ॲड अशिष देसाई, ॲड तन्वी शेख , ॲड तेजस्विनी मोकाशी यांची नेमणुक करण्यात आली आहे .

      ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये पक्षाची बाजू न्यायालयासमोर सरकारी वकील मांडतात त्याप्रमाणेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे फौजदारी प्रकरणांमध्ये मोफत विधी सहाय मिळण्यासाठी आरोपींनी केलेल्या अर्जानुसार उपरोक्त लोक अभिरक्षक कार्यालयातील वकीलांची नेमणूक केली जाईल व ते बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडतील . या कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा ही अटक होण्यापूर्वीपासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जाणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली.