HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद पॉलिटेक्ऩिकच्या ९ विद्यार्थ्यांची जीई एरोस्पेस कंपनीत निवड

शरद पॉलिटेक्ऩिकच्या ९ विद्यार्थ्यांची जीई एरोस्पेस कंपनीत निवड

 यड्राव प्रतिनिधी :  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या ९ विद्यार्थ्यांची पुणे येथील जीई एरोस्पेस कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकलच्या सतिश यादव, विष्णू पासवान, आर्यन राम, यश गलगले, अंजली सुर्यवंशी तर इलेक्ट्रीकलच्या अदित्य रजाक, अभिषेक शिंदे, विजय ढेरे, अजय माने या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

जनरल इलेक्ट्रिक कंपनी हि अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस म्हणून व्यवसाय करते. विमान इंजिन पुरवठा करणारी अग्रगण्य कंपनी आहे. इंजिन तयार करण्यासाठी इतर उत्पादकांसोबत भागीदारी करते. जीई एरोस्पेस हे भारतातील व्यावसायिक विमान वाहतूक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आघाडीच्या विमान कंपन्या, सरकारी संस्था आणि देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती संस्थांचा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून कंपनी काम करीत आहे. जीई एरोस्पेसचे उत्पन्न ३१.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. २०२४ च्या गणनेनुसार जीई एरोस्पेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५२००० आहे. पुणे येथे प्रोडक्शन युनिट आहे. 

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. तसेच सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असल्याची माहीती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे शुभम भरमगोंडा, प्रा. नेहा सोनी, प्रा यांच्यासह, सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.