पंचगंगा नदीत पोहताना दम लागल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

पंचगंगा नदीत पोहताना दम लागल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत पोहताना दम लागल्याने तरुणाचा शुक्रवारी संध्याकाळी बुडून मृत्यू झाला. पृथ्वीराज चंद्रकांत गवळी (वय १८ रा.गवळी गल्ली शनिवार पेठ कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना समजताच तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली असून पुन्हा आज सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पृथ्वीराज गवळी हा शुक्रवारी मित्रासमवेत पंचगंगा नदीत पोहचायला गेला होता.सायंकाळ पर्यंत ते पोहत होते. मात्र काही वेळाने मित्र बाहेर आले आणि पृथ्वीराज पोहत होता. त्यानंतर तो दम लागल्याने बुडाला. मित्रांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु तो खोल पाण्यात बुडाला होता.तातडीने त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून शोध मोहीम सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळून आला नाही.