कणकवली ठिकाणी गाई वाहतूक करताना पकडलेल्या गाडीवर ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरण्यात आली त्यामुळें गाडीचालकावर कडक कारवाई करण्याबाबत राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग विभागाचे पोलिसांना निवेदन

कणकवली ठिकाणी गाई वाहतूक करताना पकडलेल्या गाडीवर ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरण्यात आली त्यामुळें  गाडीचालकावर कडक कारवाई करण्याबाबत राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग विभागाचे पोलिसांना निवेदन

सावंतवाडी प्रतिनिधी अमित वेंगुर्लेकर

जिल्ह्यातून गाई वाहतूक करून गो हत्या प्रकार वाढले या प्रकारावर तात्काळ कारवाई करा

सिं

धुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात गाई व गुरे याची वाहतूक होत आहे. कणकवली या ठिकाणी एका आयशर गाडीतून गाईची कोबून वाहतूक होत होती ही वाहतूक प्रकारे होत होती. ही गाडी पकडण्यात आली सभदितगाडी पकडली या आयशर गाडीवर छत्रपती तसेच छावा या शब्दाचा वापर केला होता इतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरून हे चूकीचे प्रकारवाढले आहेतः कणकवली या ठिकाणी गाडीतून गैरप्रकारे गायींची वाहतूक केली जात होती संबंधित गाडी चालकावर व गाडीमालकावर कारवाई करुन असे प्रकार रोखावे 

अश्या प्रकारचे निवेदन राष्ट्रीय संघटना सिंधुदुर्ग विभागातर्फे सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी पोलीस नाईक दीपिका मठकर याच्याकडे देण्यात आले. यांची प्रत मुख्यमंत्री तसेच उपुख्यमंत्री ,पालकमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जात आहे ,मोठ्या प्रमाणात गायींची वाहतूक करून व हत्या करण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच कणकवली या ठिकाणी एका गाडीतून गाईची वाहतूक करताना गाडी पकडण्यात आली संबंधित गाडीवर छत्रपती व छावा असे नाव टाकण्यात आले होते ,ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे टाकून या गाडीतून गैरप्रकारे वाहतूक केली जात आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकावर तात्काळ कारवाई करावी तसेच छत्रपती व छावा हा शब्द वापरल्याने त्यांनी मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई आपण पोलीस प्रशासनाने करावी परत अशा घटना होता नये याची दक्षता घ्यावी.अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग विभागातर्फे निवेनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष .संतोष तळवणेकर .उपाध्यक्ष रामचंद्र .कुडाळकर सिंधुदूर्ग.जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे . सावंतवाडी तालुकाध्यक्ष .संदीप नाईक .माडखोल अध्यक्ष .संदीप चांदरकर .ज्ञानेश्वर पारधी .उमेश तळवणेकर . सघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.