दिल्ली महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा लवकर बदला

दिल्ली महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू  महाराजांचा पुतळा लवकर बदला

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची सध्या वर्तमानपत्रातून चर्चा सुरु आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदना मधील पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तीमत्वाला ठेच पोहोचवणार आहे. कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक मान्यवर २६ जून रोजी या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते. याप्रसंगी या पुतळ्याचे फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते, यानंतर या पुतळ्याविषयी शाहू प्रेमींमध्ये नाराजी असून हा पुतळा बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. याच संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले, दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये ज्यावेळी लोक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा हा पुतळा पाहतात त्यावेळी हा आमच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा नव्हेच ! अशीच प्रत्येकाची प्रतिक्रिया येत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजर्षी छ. शाहू महाराज यांचे पुतळे आहेत. कोल्हापुरातील दसरा चौक येथील शाहूंचा पुतळा पाहिलेले लोक जेव्हा दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामधील हा पुतळा बघतात तेव्हा निराशा व्यक्त करतात. संपूर्ण देशाची आणि कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दिल्ली महाराष्ट्र सदनातील पुतळा लवकरात लवकर बदलून त्याठिकाणी महाराजांच्या व्यक्तीमत्वाला साजेल असा पुतळा उभारून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा गौरव करावा.

भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राजर्षी शाहू हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली असे व्यक्तिमत्व असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. त्याचबरोबर दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन आलेले अनेक व्यक्ती हा सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बघितल्या नंतर नाराज होतात. आज आमची भाजपा कोल्हापूरच्या वतीने मागणी आहे कि, महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बदलून कोल्हापूर वासियांना दिलासा द्यावा.  

यावेळी सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, संगीता खाडे, संतोष भिवटे, रोहित पोवार, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सुधीर देसाई, गिरीष साळोखे, अनिल कामत, सतीश आंबर्डेकर, किसन खोत, रविकिरण गवळी, प्रवीणचंद्र शिंदे, महादेव बिरंजे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.