कोरे अभियांत्रिकीत ऍपल लॅबचे उद्घाटन

कोरे अभियांत्रिकीत ऍपल लॅबचे उद्घाटन

वारणानगर (प्रतिनिधी)  येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील  संगणक विभागामध्ये अत्याधुनिक  ऍपल लॅब व ट्रेनींग सेंटर चे उदघाट्न  रोजी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्नी यांचे हस्ते पार पडले.

सदर लॅबच्या उभारणीसाठी आमदार डॉ. विनयरावजी कोरे, अध्यक्ष श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूह यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.  या कार्यक्रमास संचालक डॉ. सौ.कल्पना पाटील, अधिष्ठाता डॉ. एस एम पिसे, प्राचार्य डॉ. डी.एन.माने , डॉ. आर.बी.पाटील ,  प्रस्तावित वारणा विद्यापीठातील सर्व संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, व विद्यार्थी उपस्थित होते. हि लॅब तयार करणेसाठी डॉ. धनराज पाटील,प्रा. प्रवीण देशमुख, प्रा. विशाल सनदे, श्री. एन. बी. जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

या प्रसंगी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्नी म्हणाले की, यांनी ॲपल ही लॅब एक अत्याधुनिक सुविधा पुरवेल जिथे विद्यार्थी iOS ऍप्लिकेशन्स शिकू आणि विकसित करू शकतील, ऍपलच्या तंत्रज्ञान आणि टूल्सचा प्रत्यक्ष अनुभव मिळवू शकतील  . जागतिक स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवणेसाठी , विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.