बायोलॉजीचे विद्यार्थीही आता अभियांत्रिकीला ठरणार पात्र!

बायोलॉजीचे विद्यार्थीही आता अभियांत्रिकीला ठरणार पात्र!

कोल्हापूर (प्रतिनिधि) :  शैक्षणिक वर्ष २४-२५ पासून बारावीला ग्रुप-बी (पीसीबी) म्हणजेच फक्त बायोलॉजी (जीवशास्त्र) ग्रुप असणारे विद्यार्थी आता अभियांत्रिकीला पात्र होणार आहेत. राज्य शासनाच्या २०२४-२५ च्या पदवी व पदव्युत्तर अभियांत्रिकी नवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकातील क. ७ च्या पात्रता निकषांच्या संदभनि परावीच्या बायोलॉजीच्या सद्यार्थ्यांनी राज्य सरकारची सामाईक बेश परीक्षा (सीईटी) दिली आहे. केंद्र सरकारची 'नीट'ची परीक्षा दिली असेल त्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थेट संधी दिली जाणार आहे. यामुळे मेडिकल, फार्मसी अशा प्रवेश परीक्षांना अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे.

एआयसीटीईने बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकीसाठी पीसीबी ग्रुपला मान्यता दिली. सीईटी सेलच्या परिपत्रकानुसार या वर्षापासून पीसीबीचे विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. असं आवाहन के आय टी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केलं आहे. भविष्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटि इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिआ फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्ट केमिस्ट्री अशा अभ्यासक्रमांना मिळणे शक्य होणार आहे. याबाबतची माहिती लवकरात लवकर सरकारकडून जाहीर केली जाणार आहे. अभियांत्रिकीच्या प्रक्रियेमध्ये नोंदणीस १० जुलै पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रजिस्ट्रेशन, कागदपत्रांची उपास छाननी व ऑप्शन कोर्म भरता येणार आहेत.