कोरे अभियांत्रिकीस एआयसीटीई कडून अटल एफडीपी साठी निधी
वारणानगर प्रतिनिधि: तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग (स्वायत्त), वारणानगर, कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, भारत सरकारकडून टल एफडीपी संशोधन प्रस्ताव योजनेअंतर्गत "इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन सेल वाहनांसाठी शाश्वत गतिशीलता" या विषयावर विकास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 3.5 लाखांचा निधी प्राप्त झाला. या विकास कार्यक्रमामुळे इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन सेल वाहनांमधील नवीनतम तंत्रज्ञान आणि प्रगती यांची व्यापक माहिती मिळेल.आघाडीच्या उद्योगातील तज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ञांकडून वर्तमान ट्रेंड आणि शाश्वत गतिशीलतेमधील भविष्यातील संभावनांबद्दल माहिती मिळेल.इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधन सेल वाहनांना नियंत्रित करणारी धोरणे, नियम आणि मानकांबद्दल अंतर्दृष्टी माहिती मिळेल. तसेच ऑटोमोटिव्ह उद्योगातील भविष्यातील ट्रेंड आणि घडामोडींवर अद्ययावत माहिती मिळेल, विशेषत: टिकाऊ गतिशीलतेच्या संदर्भात.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष, विनयरावजी कोरे, श्री वारणा शिक्षण विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कारजिन्नी, डॉ. एस.एम. पिसे (डीन, एसईटीएम), प्र. प्राचार्य, डॉ. डी.एन. माने आणि रजिस्ट्रार, एस.व्ही. खंडाळ यांनी हे यश मिळवल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा टप्पा गाठण्यासाठी प्राध्यापक सी.पी. शिंदे, विभाग प्रमुख,इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, डॉ. उमेश देशनवार (संचालक, इनोव्हेशन, संशोधन आणि भागीदारी), आणि डॉ. आर.व्ही. काजवे (डीन, संशोधन) यांनी ईटीसी टीमला मार्गदर्शन केले. डॉ.एस.आर. कुंबIर या समन्वयक असून, डॉ. प्रवीण जी. ढवळे (सहसंयोजक) आणि प्रा. पी.व्ही. लोखंडे (तज्ञ) आहे. या संशोधन प्रस्ताव मिळवण्यासाठी ई अँड टीसी विभागाने खूप मेहनत घेतली.