HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करा-आमदार अमल महाडिक यांची क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करा-आमदार अमल महाडिक यांची क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर हे फुटबॉल शौकिनांची नगरी म्हणून ओळखली जाते. कलकत्ता गोव्यानंतर कोल्हापूरमध्ये फुटबॉलचे सर्वाधिक सामने रंगतात. इथल्या पेठा पेठांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून फुटबॉल रुजला आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची ओळख निर्माण केली आहे.

या खेळाडूंना योग्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले होते. पण काही कारणाने हे केंद्र पुणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील उदयोन्मुख फुटबॉलपटूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. योग्य प्रशिक्षण अभावी अनेक जण क्षमता असूनही आपले कौशल्य सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलवर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे. हे निवासी प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉल शौकिनांमधून होत होती. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन कोल्हापुरात निवासी प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

कोल्हापुरात फुटबॉलला असलेला जनाधार पाहता अनेक खेळाडू या मातीत घडतील. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे पुण्याला येऊन फुटबॉल चे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन लवकरात लवकर या संबंधीचा निर्णय व्हावा अशी आग्रही मागणी आमदार महाडिक यांनी क्रीडा मंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडून नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड अंतर्गत कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी पाच कोटी रुपये खर्चून वसतिगृह उभारण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली. 

या दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.