शिक्षकांच्या बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध - डॉ. मिना शेंडकर

शिक्षकांच्या बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुविधा उपलब्ध  - डॉ. मिना शेंडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा टप्पा क्रमांक 4 अंतर्गत पात्र शिक्षकांना शाळा निवडीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या 18 जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मिना शेंडकर यांनी दिली. 

महत्त्वाच्या तारखा :

रिक्त पदांची सुधारित यादी - 27 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून प्रसिद्ध करण्यात आली असून ती सर्व शिक्षक त्यांच्या स्वत: च्या लॉगिनवर पाहू शकतात.

प्राधान्यक्रम नोंदणी कालावधी - 28 जुलै ते 31 जुलै या दरम्यान पात्र शिक्षकांनी आपले लॉगिन वापरून शाळांचे प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडावेत.

महत्त्वाचे निर्देश : 

- प्राधान्यक्रम नोंदणी ही संबंधित शिक्षकांची जबाबदारी आहे. यामध्ये चूक झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षकाचीच राहील.

- 31 जुलै नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

- प्राधान्यक्रम नोंदविल्यानंतर शिक्षकांनी आपल्या निवडलेल्या पर्यायांची पडताळणी करून अर्ज अंतिम करावा आणि ऑनलाईन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी.

- अंतिम सबमिट केलेल्या अर्जाची हार्डकॉपी संग्रही ठेवावी.

- ज्या शिक्षकांना टप्पा क्रमांक 4 अंतर्गत बदलीसाठी पात्रता आहे, त्यांनी दिलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.