कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंदी आदेश लागू..
कोल्हापूर (प्रतिनिधी) नीरजन कामत
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आज सकाळ ( ५ जुलै) पासून बंदी आदेश लागू करण्यात आलाय.
मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाकडून हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे आणि सभा घेणे, याला बंदी असेल.अपर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांच्या आदेशानुसार हा बंदी आदेश काढला आहे.
तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे यालाही बंदी असेल.