तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या

तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या

वृत्तसंस्था : गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.

तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं. निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिया आणि एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरलं असल्याचं म्हटलं आहे.